लातूर, दि. ०३ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या ३ व ४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांचे ३ एप्रिल रोजी रात्री धाराशिव येथून लातूर येथे आगमन होईल. ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता लातूर येथून उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता उदगीर येथे आगमन होईल व श्री. जशन देवप्रिय डोळे यांची सांत्वनपर भेट घेतील. सकाळी १० वाजता लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व पदाधिकारी यांची बैठक घेतील. दुपारी २.३० वाजता लातूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, जिल्हा प्रशासनासमवेत विविध विषयांवर आढावा बैठक घेतील. सायंकाळी ४ वाजता सोलापूरकडे प्रयाण करतील.
*****