*1 लाख 91 हजार रुपयाचा 9.5 किलो गांजा जप्त. दोन आरोपीवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .*

                लातूर (पोअका) : लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्या नुसार, लातूर जिल्ह्यातील तालुका चाकूर शहरातील अण्णाभाऊ साठे नगर, येथे एक व्यक्ती त्याचे राहते घरामध्ये स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरीष्ठांना कळवून शासकीय पंचसह अण्णाभाऊ साठे नगर चाकूर येथे आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:50 वाजता छापा मारला असता तेथे इसम नामे  1) अनिल शिवाजी सूर्यवंशी, वय 48 वर्ष, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, तालुका चाकूर जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्याच्या राहते घराची झडती घेतली असता घरात खताच्या पांढऱ्या रंगाच्या  पिशवीमध्ये बी मिश्रित नऊ किलो 565 ग्राम गांजा एक लाख 91 हजार 300 रुपयाचा मिळून आला. नमूद गांजा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सदरच्या गांजा अवैध विक्रीसाठी 2) ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे राहणार कृष्ठधाम, विवेकानंद चौक, लातूर याचे कडून विकत घेतला असल्याचे सांगितले.दोन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अनिल सूर्यवंशी याला  सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असून दुसरा आरोपी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
       पोलीस अधीक्षक लातूर, श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक  राजाभाऊ घाडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे,सुधीर कोळसुरे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, रियाज सौदागर, प्रदीप चोपणे यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर पोलीस दलाच्या वतीने खाजगी सावकारी विरोधात तक्रार निवारण दिन*

       लातूर  (पोअका) : वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेकजन इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खाजगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेवू...

लोकप्रिय बातम्या