21 व्या शतकाच्या सुरुवातीस मराठवाड्यातील अति दुष्काळी बीड जिल्ह्यात तंत्रशिक्षणाच्या ज्ञानगंगाची सुरुवात ज्यांनी केली असे थोर व्यक्तीमत्त्व म्हणजे *मा. श्री. सुभाषचंद्रजी (भाऊ) सारडा साहेब* मराठवाड्यातील बीड जिल्हा हा अतिदुर्गम व दुष्काळी तसेच ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून याची ओळख 20 व्या शतकात उदयास आली. या ओळखीने उदयास आलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यकीय शिक्षण, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यायचं म्हटलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी तर सोडाच पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोठेही उपलब्ध नव्हते. अशा वेळेस बीड जिल्ह्यामधील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला उच्च व तंत्र शिक्षण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हावे. म्हणून मा. भाऊसाहेब यांनी सन 2000 मध्ये आदित्य शिक्षण संस्थेची स्थापना करून, शैक्षणिक वर्ष 2000-2001 मध्ये आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोपटे लावले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांना संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या पदवीचे शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आले.
मा. भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या बीड जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग या माध्यमातून चांगल्या पद्धतीने जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू झाला. शिक्षण संस्थेत बीड जिल्ह्यामधील मराठवाड्यातील राज्यातील तसेच परराज्यातील जम्मू-काश्मीर, बिहार अशा अनेक ठिकाणीचे विद्यार्थीही प्रवेश घेऊ लागले. संस्थेमार्फत मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकास होण्यास प्रारंभ झाला. पुढे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत संस्थेमार्फत कृषी, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, व जैवतंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची नवीन चार महाविद्यालय संस्थेमार्फत बीड शहरात सुरू करण्यात आली. आता विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच कृषी, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी व जैवतंत्रज्ञान शास्त्राचे शिक्षण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्याला इतर ठिकाणी जाण्यास लागणारा खर्च व इतर गोष्टींची सुविधा खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्या त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आदित्य शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन आपला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून योग्य पदावर कार्यरत होऊन कार्य करू लागली.
मा. भाऊसाहेबांच्या मनामध्ये अभियांत्रिकी व कृषी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून वैद्यकीय व व्यवस्थापनशास्त्र शिक्षण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे. म्हणून मा. भाऊसाहेबांनी वैद्यकीय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाची सुरुवात केली. या अंतर्गत विद्यार्थ्याला दंत, आयुर्वेदिक व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे पदवीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्याला अभियांत्रिकी पदवी बरोबरच विद्यार्थ्याला कमी कालावधीमध्ये रोजगार निर्मिती व्हावी. म्हणून मा. भाऊसाहेबांनी अभियांत्रिकी पदविका (Diploma Polytechnic) अभ्यासक्रमाची सुरुवात केली. या मार्फत विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन अभ्यासक्रमास प्रवेश घेईल व तीन वर्षात पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून नामांकित कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्य करण्यास तयार होईल. विद्यार्थ्याला कमी वयात रोजगार निर्मिती होई यामुळे पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला संस्थेमध्ये आता अभियांत्रिकी पदवी व पदविका, वैद्यकीय दंत शिक्षण, आयुर्वेदिक, कृषी, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र अशा सर्व अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा ओढा पाहून मा. भाऊसाहेबांच्या आशा द्विगुणीत झाल्या त्यांच्या मनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांतर्गत चालू असलेल्या शैक्षणिक कार्यास उंच भरारी मिळू लागली. संस्थेमध्ये असंख्य विद्यार्थी शिकत आहेत. हे पाहून मा. भाऊसाहेबांचे मन हर्ष उल्हासित झाले.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आदित्य शिक्षण संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आणि या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये मा. भाऊसाहेब यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाला आहे. संस्थेमध्ये सध्या बीटेक, एमटेक, बीडीएस, एमडीएस, बीएएमएस (आयुर्वेदिक), अभियांत्रिकी पदविका, (Diploma Polytechnic) एमबीए, एमसीए, कृषी, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, फार्म डी, बीएससी नर्सिंग, जी एन एम, फिजिओथेरपी, डीएड, बीएड, बीएससी, एमएससी व आयटीआय अशा अभ्यासक्रमांतर्गत प्रतिवर्षी हजारो विद्यार्थी पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र घेऊन उत्तीर्ण होत आहेत. जिल्ह्यात, राज्यात परराज्यात व देशात अनेक ठिकाणी प्रथम वर्ग अधिकारी, तसेच नामांकित कंपनीत कार्यरत असून, सक्षम उद्योगांतर्गत स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा आहेत. याचा मा. भाऊसाहेबांना सार्थ अभिमान आहे.
मा. भाऊसाहेबांनी मराठवाड्यातील अति दुष्काळी बीड जिल्ह्यात वैद्यकीय व तंत्रशिक्षणाच्या ज्ञानगंगाची सुरुवात केल्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध झाले आहे. यामुळे आज संस्थांतर्गत शिकत असलेले असंख्य विद्यार्थी *शिक्षणमहर्षी मा. श्री. सुभाषचंद्रजी (भाऊ) सारडा साहेब* यांचे शतशः ऋण व्यक्त करत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या निःस्वार्थ सेवेने चालू असलेले कार्य आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
*मा. श्री. भाऊसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!*
आपले कार्य समाजातील प्रत्येक विद्यार्थी, तरुण युवावर्ग यांना नवा उत्साह व प्रेरणा निर्माण करत आहे. आपली दृष्टी, कष्ट आणि समाजासाठी केलेली निस्वार्थ सेवा आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. आपण ज्या पद्धतीने सहकार, शिक्षण आणि समाजसेवा यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. आपल्याला दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*-:शुभेच्छुक:-*
*प्रा. अशोक सवासे*
*आदित्य शिक्षण संस्था, बीड.*