लातूर शहर मनपा आयुक्तत तथा प्रशासक हेच डॉ. आंबेडकर पार्क पुतळा निर्मितीत अडसर !

      लातूर  (दैलाप्रप्र) : लातूर शहर सर्वांगीण क्षेत्रात विकसित असे अग्रेसर ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क व पुतळा असून समोरच यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने लातूर महानगरपालिकेचा कारभार चालतो आहे. लातूर मनपात कोठे काय घडते आहे त्यावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा आहे, पण लातूर महानगरपालिकेचा कारभार काही सुरळीत चालत नाही अशी ओरड नेहमीच असते. 
      माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी  खुर्ची स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा पुतळा बसवण्याची मंजुरी आणली, प्रतिष्ठापना झाली, पण पुतळा निर्मितीसाठीचा निधी मनपा लातूरकडे वर्ग केला अशी चर्चा आहे. मात्र पुतळा उभारणीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक हे अडसर करत आहेत, ते राजकीय दबावत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होताना दिसते आहे. 
      लातूर मनपा आयुक्त तथा प्रशासक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शासकीय सेवे मार्फत जनसेवा करीत असल्याचे बोलले जाते,  पण मागासवस्त्या, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणाच्या विरोधातच कसे काय अशीच उलट सुलट कुजबुज लातूर शहर व लातूर मनपा वर्तुळात होताना दिसते आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा*

            लातूर, दि. ०३ :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या ३ व ४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्या...

लोकप्रिय बातम्या